Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेगाव बसमध्ये चढताना जळगावात महिलेची सोन्याची पोत लांबविली !
    क्राईम

    शेगाव बसमध्ये चढताना जळगावात महिलेची सोन्याची पोत लांबविली !

    editor deskBy editor deskMarch 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील अजिंठा चौफुली येथून शेगाव बसमध्ये चढणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेची अनोळखी चोरट्याने ४२ हजार रुपये किमतीची सोन्याच्य मंगळपोत चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील कासमवाडी परिसरातील रहिवासी असलेल्या मालतीबाई सुखदेव देशमुख (वय ६०) या महिलेच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळपोत चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
    कासमवाडीतील मालतीबाई देशमुख या भुसावळातील मुलाकडे जाण्यासाठी बुधवारी सायंकाळी ५ वाजता अजिंठा चौफुलीवर आल्या होत्या. शेगाव बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीची मंगलपोत चोरून नेली. बसमध्ये आल्यावर त्यांनी गळ्याला हात लावला. तेव्हा त्यांना गळ्यातील पोत दिसून आली नाही. लागलीच त्या बसखाली उतरल्या आणि पोतचा शोध घेतला; मात्र ती मिळून न आल्यामुळे बसमध्ये चढताना कुणीतरी गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेल्याची खात्री झाली. अखेर शुक्रवारी सकाळी मालतीबाई देशमुख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास इमरान सैय्यद हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.