Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन मुलींचा पिता करीत होता लग्न अचानक समोर आली पहिली पत्नी !
    क्राईम

    दोन मुलींचा पिता करीत होता लग्न अचानक समोर आली पहिली पत्नी !

    editor deskBy editor deskMarch 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील लग्न महत्वाची क्षण असतो अन लग्नाच्या स्टेजवर जर लग्न हुकले तर त्याला खूप मनस्ताप देखील होत असतो. अशीच एक संतापजनक घटना उत्तर एटमध्ये घडली आहे.

    पहिल्या पत्नीची फसवणूक करून लग्न करत असलेल्या दोन मुलांच्या वडिलाचा भांडाफोड झाला. त्याची पहिली पत्नी आणि तिच्या भावांनी लग्नात येऊन स्टेजवरच गोंधळ घातला. सोबतच नवरदेवाला मारहाणही केली. त्यानंतर नवरीकडील लोकांनी नवरदेव आणि त्याच्या आई-वडिलांना पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नवरदेवाला तुरूंगात टाकलं.
    एटामध्ये दुसरं लग्न करण्यासाठी आलेला कपिंजल यादव याचं लग्न श्वेता यादवसोबत 2012 मध्ये झालं होतं. श्वेताच्या वडिलांनी लग्नात भरपूर पैसा खर्च केला होता आणि 20 लाख रूपये सुद्धा दिले होते. कपिंजल याला पत्नी श्वेताकडून दोन मुलीही झाल्या. दोन मुलींच्या जन्मानंतर अचानक कपिंजल आणि त्याच्या परिवाराच्या वागण्यात बदल झाला. मग श्वेता आपल्या दोन्ही मुलींना घेऊन माहेरी आली.
    पत्नी श्वेता माहेरी जाताच कपिंजल आणि त्याच्या कुटुंबियांनी एटामध्ये त्याचं लग्न ठरवलं. कपिंजल 15 मार्चला मोठ्या धडाक्यात वरात घेऊन दाखिनी रिसॉर्टमध्ये पोहोचला होता. लग्नाचे सगळे रितीरिवाज पार पाडले जात होते, तेव्हाच हार घालताना स्टेजवर त्याची पहिली पत्नी श्वेता आणि तिच्या भावांना गोंधळ घातला. नवरदेवाला मारहाण केली, तसेच त्याचा भांडाफोड केला. हे सगळं प्रकरण समजल्यावर नवरी आणि तिच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. नवरीने थेट लग्नास नकार दिला. या फसवणुकीमुळे नवरीच्या वडिलांनी पोलिसांना बोलवलं आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. तेच पहिली पत्नी श्वेताने भाऊ मनोज कुमारच्या तक्रारीवर पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करत त्यांना तुरूंगात पाठवलं. तर भांडाफोड झाल्यावर पळून गेलेल्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.