• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण मतदार संघात ७० कोटीची कामे मंजूर !

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची 75 किमीचा होणार कायापालट : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

editor desk by editor desk
March 17, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य
0
जळगाव ग्रामीण मतदार संघात ७० कोटीची कामे मंजूर !

जळगाव : प्रतिनिधी

ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेतून राज्यातील वाड्या, वस्त्या, गावांना रस्ते बांधून देण्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या व दुरवस्था झालेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, दुसरा टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात 75 किमीच्या रस्त्यांसाठी 66 कोटी 86 लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी असा एकूण सुमारे 70 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी समाधान व्यक्त होत आहे. ना. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन यांचे आभार मानले आहेत.‎ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या समितीमार्फत रस्तेबांधणी आणि दर्जोन्नतीसाठी गावांची निवड केली जाते तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत रस्त्यांच्या कामासाठी भूसंपादन करणे, अतिक्रमणे हटविणे व इतर अडचणी दूर करुन समन्वय साधण्याची जबाबदारी असते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर कामे अशी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात धरणगाव विवरे ते भवरखेडा रस्ता धरणगाव – विवरे – भवरखेडा ते तालुका हद्द ग्रा.मा. 4, 46, 64 व इजिमा 55 रस्ता – (12 किमी – 9 कोटी 46 लक्ष 84 हजार), झुरखेडा- खपाट ते पिंपळेसीम ग्रा. मा. 16, 78 रस्ता ( 5 किमी – 3 कोटी 77 लक्ष 69 हजार), चावलखेडा ते पष्टाणे ग्रामीण मार्ग 19 , इजिमा 58 , 52 रस्ता (6 किमी- 4 कोटी 42 लक्ष 33हजार), विवरे – जांभोरा – सारवे खुर्द ते बिलखेडा ग्रा.मा. 29, 66 , 58 रस्ता ( 10 किमी – 08 कोटी 21 लक्ष 35 हजार ) अश्या 4 रस्त्यांच्या 33 किमी रस्त्यांसाठी 25 कोटी 88 लक्ष 21 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. तर जळगाव तालुक्यातील डोमगाव – पाथरी ते तालुका हद्द ग्रा.मा. 45 रस्ता ( किमी 7.80 – 6 कोटी 9 लक्ष 21 हजार), भोकर – पडसोद – जामोद – आमोदे ते गाढोदा इजिमा 44 रस्ता ( 12 किमी – 10 कोटी 53 लक्ष 96 हजार), आसोदा ते भोलाणे ग्रा.मा. 105, इजिमा 08 रस्ता (6.30 किमी 6 कोटी 83 लक्ष 83 हजार ), खेडी ते ममुराबादइजिमा 88 रस्ता ( 5.73 किमी – 6 कोटी 51 लक्ष 73 हजार), कानळदा ते रिधुर ग्रा.म. 39 रस्ता (5.45 किमी- 5 कोटी 71 लक्ष 64 हजार) , तसेच प्रजिमा 39 ते शिरसोली रस्ता तालुका हद्द दहीगाव रस्ता ( 5 किमी – 5 कोटी 28 लक्ष 12 हजार) अश्या 6 रस्त्यांच्या 42 किमी रस्त्यांसाठी 40 कोटी 98 लक्ष 49 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात असा 75 किमीच्या रस्त्यांसाठी 66 कोटी 86 लक्ष व देक्षभाल दुरुस्तीसाठी 3 कोटी एकूण सुमारे 70 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी समाधान व्यक्त होत आहे. यांनी मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन, पालकमंत्री गुलाबराव‎ पाटील यांचे आभार मानले आहेत.‎

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागासाठी वरदान ! – ना. गुलाबराव पाटील

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला असून, दुसरा टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्तेखऱ्या अर्थाने दर्जेदार होत आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी 75 लाख रुपयांच्या निधीची तरतूद असून मक्तेदारावर 5 वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. या योजनेत रस्त्यांचे काम दर्जेदार‎ होणार असून गावांतर्गत काँक्रीट रस्ते,‎ आवश्यक तेथे पूल , संरक्षक भिंती‎ आदी कामांचा समावेश असल्यामुळे परिपूर्ण रस्त्याचा विकास होणार आहे. जिल्ह्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यांची जोडणी करण्यासाठी ही योजना लाभदायक व वरदान ठरत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून, जळगाव जिल्ह्यात संबंधीत शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येत असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही ग्रामीण भागासाठी वरदान ठरत असल्याचा विश्वास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बोलतांना व्यक्त केला सदर रस्ते दर्जेदार होण्यासाठी यंत्रणांनी काळजी घेण्याचे निर्देशही गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Previous Post

या मुलीने लावले तरुणांना वेड ; पहा व्हिडीओ !

Next Post

आरोग्य : जेवण करतेवेळी मीठ खाताय होणार धोका !

Next Post
आरोग्य : जेवण करतेवेळी मीठ खाताय होणार धोका !

आरोग्य : जेवण करतेवेळी मीठ खाताय होणार धोका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group