Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खड्ड्यासंदर्भात मनसेचे मनपा समोर ‘झोपा काढा’ आंदोलन
    जळगाव

    खड्ड्यासंदर्भात मनसेचे मनपा समोर ‘झोपा काढा’ आंदोलन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 4, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी: शहरातील रस्ते अमृत योजनेमुळे  खड्डेमय झाले होते त्यात पुन्हा भूमिगत गटारीचे कामे सुरू आहे त्यात पावसाळा सुरू असल्याने रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊनही ही कामे होत नसल्याने आज आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेसमोर झोपा काढा आंदोलन करण्यात आले .

    शहरामध्ये जवळपास दोन ते तीन वर्षापासून रस्त्यांचे तसेच भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची पूर्णत: वाताहात झालेली आहे. त्यातच ऐन पावसाच्या दिवसामध्ये तर जनतेला खराब रस्त्यांमुळे नरक यातना सहन कराव्या  लागत आहेत. याबाबत आम्ही आपणांकडे निवेदने दिले असता तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वेळोवेळी आंदोलने करून सुध्दा हे प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. त्या प्रशासनाला उठविण्यासाठी आज सकाळी मनपा इमारतीत ‘झोपा काढू’ आंदोलन मनसे जिल्हा सचिव ॲड.जमिल देशपांडे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, आपणांकडून आम्हांस सांगण्यात येते की, सद्यस्थितीत म.न.पा.जवळ पैसा नसल्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण होऊच शकत नाही, तसेच जी काही वसूलीची रक्कम येते ती रक्कम अमृत योजनेसाठी वापरली जाते, त्यामुळे आमचा नाईलाज झालेला आहे असे उत्तरे आयुक्त साहेबांकडून आम्हांस मिळत आहेत. महोदय, साहेब आपणांकडून अशा उत्तराची आम्हांस आता अपेक्षा नसून आपणाकडे जर रस्त्यांच्या कामासाठी पैसे नसतील तर आपण सुध्दा ऑफीसला का येत असतात ? सदरील जळगांव शहरातील रस्त्यांची कामे ज्या संबंधित ठेकेदार/ इंजिनिअर्स यांना दिलेले असले त्यांचा आमच्याशी प्रत्यक्ष संपर्क करुन द्यावा अथवा त्यांचा मोबाईल नंबर आम्हांस द्यावा म्हणजे आम्हा आता त्यांनाच याबाबत जाब विचारणार आहोत. तरी महोदय साहेब आपणास आता आमची हात जोडून नम्र विनंती की, जळगांव शहरातील संपूर्ण रस्त्यांच्या कामांना 10 दिवसाचे आत सुरुवात करावी. या आशयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी जनहित शहर अध्यक्ष संदिप मांडोळे, मनविसे शहराध्यक्ष योगेश पाटील, संदीप महाले, जळगाव शहर संघटक निलेश अजमेरा, तालुका संघटक राजू बाविस्कर, महेश माळी, जळगाव तालुका संघटक गणेश नेरकर, कुणाल पाटील, कुणाल पवार, गोविंद जाधव,विशाल कुमावत, संतोष सुरवाडे, रमेश भोई, मनोज खुळे, निलेश खैरनार, अँड.दिनेश चव्हाण, मंगेश भावे, सिध्देस कवठाळकर, गोरख गायकवाड, संदिप पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    नगर परिषद, नगर पंचायतीचा निकाल पडणार लांबणीवर !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.