• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलांसाठी मोठी बातमी : बसमध्ये मिळणार विशेष सवलत !

editor desk by editor desk
March 17, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
महिलांसाठी मोठी बातमी :  बसमध्ये मिळणार विशेष सवलत !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने यंदाच्य महिला दिनानिमित महिलांसाठी राज्यातील ‘महिला सन्मान योजना’ जाहीर केली होती. त्यामुळे राज्यातील महिलांना कुठल्याही गावी प्रवास करण्यासाठी आता बसमध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना आज शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.

सध्या १२ वर्षांखालील मुलींना आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत * ७५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ महिलांना १०० टक्के सवलत दिली जाते * नव्या योजनेमुळे १६-१७ लाख महिला प्रवाशांपैकी दररोज १२-१३ लाख महिला प्रवाशांना ५० टक्के तिकीट सवलतीचा फायदा होईल.

एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के ते 100 टक्के प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे. तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. या सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे. एसटी महामंडळातर्फे समाजातील विविध ३० घटकांना प्रवास भाड्यात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येते. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवासाची सुविधा गेल्या वर्षी २५ ऑगस्टपासून सुरु केली. या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे ६ कोटी ज्येष्ठ प्रवाशांनी झाला आहे. सध्या दररोज सरासरी ५ लाखापेक्षा जास्त अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीच्या विविध बसेसमधून मोफत प्रवास करत आहेत. यामुळे एसटी महामंडळाला महिन्याला ६५ते ७५ कोटी रुपयांची प्रतिपुर्ती रक्कम राज्य सरकारकडून मिळते. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यातून महामंडळाला दिवसाला (प्रतिपुर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नवीन योजनेमुळे देखील महामंडळाला कोट्यवधी रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यातून महामंडळाला फायदा होईल.

Previous Post

अमळनेरात झाडाची फांदी पडून तरूण ठार !

Next Post

उन्हाच्या कडाख्यात जेव्हा ढगातून धबधबा तेव्हा ; पहा व्हिडीओ !

Next Post
उन्हाच्या कडाख्यात जेव्हा ढगातून धबधबा तेव्हा ; पहा व्हिडीओ !

उन्हाच्या कडाख्यात जेव्हा ढगातून धबधबा तेव्हा ; पहा व्हिडीओ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group