धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तहसील कार्यालयात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास एसबीच्या पथकाने नायब तहसीलदार यांच्यासह एका कोतवालावर लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार जयंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे नामक इसमाने तक्रारदार यास वाळू वाहतूक डंपरने सुरु राहू देण्यासाठी ३० हजाराची लाच मागितली होती ती तडजोडअंती २५ हजार रुपय निश्चित झाली होती पण तक्रारदाराने जळगाव येथील एसीबीकडे याची तक्रार केली होती. या प्रकरणी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी यांच्या पथकासह लाच घेताना कोतवालासह नायब तहसीलदार यांना ताब्यात घेतले होते. तहसील कार्यालयात केलेल्या कारवाईने अधिकारी वर्गामध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.