चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ३३ वर्षीय महिलेचा एकाने महिलेच्या पतीसह दिराला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी अनवर युसुफ पठाण (वय ३३) याने ३३ वर्षीय महिलेचा पाठलाग करीत अश्लील हातवारे करीत असल्याने महिलेच्या पतीने संशयित आरोपीस बोलण्यास गेला असता त्याला देखील मारहाण करीत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण देखील केली तर याठिकाणी महिलेचा दीर हा आला असता त्याला देखील संशयित आरोपीने मारहाण केल्याने फिर्यादी महिलेने चाळीसगाव ग्रामीण पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार करीत आहेत.