• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अन्… या माकडानं केलं तरी काय की गावातील तरुणांना रडू कोसळलं

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 3, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
अन्… या माकडानं केलं तरी काय की गावातील तरुणांना रडू कोसळलं

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील वि. का. सोसायटी जवळ झालेल्या ट्रक च्या अपघाताने गंभीररीत्या जखमी झालेल्या वानरीचे दुपारी १२:१५ वाजता दुःखद निधन झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी ९ वाजता विविध कार्यकारी सोसायटीजवळ एका ट्रक च्या धक्क्याने माकड (मादी) गंभीररीत्या जखमी झाली. ही सर्व घटना लहान माळी वाडा परिसरातील भागवत महाजन (आटो वाले) यांनी बघितली व त्यांनी त्या वानरीला आपल्या रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.

त्यानंतर या घटनेची माहिती लहान माळी वाडा (मढी परिसर) येथील युवक मंडळाच्या सर्व मित्रांना कळली असता त्यांनी लगेचच ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर वानरी ला लहान माळी वाड्यात भागवत महाजन यांच्या घरी आणले गेले. या सर्व प्रकारची माहिती वनविभाला देण्यात आली, त्यांनी प्रत्यक्ष येऊन सर्व परिस्थिती पाहिली.भागवत महाजन यांच्यासह सर्व युवक मित्रांनी कसोशीने प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

त्या जखमी वानरी चे आज दुपारी १२:१५ वाजता दुःखद निधन झाले. वानरीच्या निधनाबाबतची सर्व माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. भागवत महाजन यांच्या घरी परिसरातील महिला मंडळींनी येऊन आपल्या दुःखद संवेदना व्यक्त केल्या. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्ती चे निधन झाल्यानंतर सर्वदूर हळहळ व्यक्त केली जाते त्याप्रमाणे या वानरीच्या निधनाने सर्व परिसरावर शोककळा पसरलीे. मृत वानरीचे विधिवत सर्व विधीसंस्कार करण्याचे निश्चित करण्यात आले.

या मातेचे एक लहानसे पिल्लू देखील या अपघातात जखमी झाले परंतु सुदैवाने त्याचा जीव वाचला. आईपासून दुरावलेल्या त्या लेकराला पाहून सर्वांचे डोळे पाणावले. परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात वनविभागाची पूर्व परवानगी घेऊन या मृत मकडावर (मदी) ‘वानर देव मंदिर’ सोनवद रोड येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दूध चढवण्याचा कार्यक्रम उद्या दि. ४/१०/२०२१ रोजी सकाळी ७ वाजता होईल. तसेच येत्या काही दिवसात नवरात्रोत्सव सुरू होणार असल्यामुळे वानरीचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी म्हणजे दि. ५/१०/२०२१ रोजी सिध्दी हनुमान मंदिर येथे होणार आहे. मृत वानरीच्या लहान पिल्लाला उद्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. या अंत्यसंस्कार प्रसंगी गावातील व परिसरातील अनेक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्व घटनाक्रमात भागवत महाजन यांच्यासह लहान माळी वाडा (मढी परिसरातील) सर्व युवक मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

Previous Post

वावडदा येथे उद्या मोफत लसीकरण होणार !

Next Post

नवनिर्वाचित बाराबलुतेदार ग्रा.पं.सदस्य सुकलाल कुंभार यांचा सत्कार ;

Next Post
नवनिर्वाचित बाराबलुतेदार ग्रा.पं.सदस्य सुकलाल कुंभार यांचा सत्कार ;

नवनिर्वाचित बाराबलुतेदार ग्रा.पं.सदस्य सुकलाल कुंभार यांचा सत्कार ;

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group