प्रतिनिधी प्रविण पाटील: वावडदा तालुका जळगाव येथे उद्या ३अक्टो. रोजी जि.प.सदस्य पवनभाऊ सोनवणे यांच्या प्रयत्नातून म्हसावद जि.प.मराठी शाळा येथे लसीकरणास होणार आहे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर नाशिककर, डॉ.प्रशांत गर्ग व डॉ.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने लसीकरण होणार आहे.
या लसीकरनात जळके आरोग्य उपकेंद्राचे सि.एच.ओ.थोरात मॅडम,ए.एन.एम.सपकाळेमॅडम, आरोग्य सेवक सलीम भाऊ पिंजारी तसेच अनिता धनगर, अरुणा सपकाळे,वच्छला चव्हाण,सरिता पाटील,गोजर पाटील व जयश्री पाटील या सर्व आशा वर्कर लसीकरण केंद्रावरसकाळी ९ वाजले पासुन जि.प.मराठी शाळा येथे लसीकरणास सुरुवात करतील.
या ठिकाणी कोविशिल्ड लस उपलब्ध असेल पहिला व दुसरा डोस असणार आहे तरी नागरिकांनी आपल्या सोबत लसीकरण केंद्रावर आधार कार्ड व ओ.टी.पि.साठी मोबाईल आणणे आवश्यक आहे या लसीकरण केंद्रावर २५०डोस उपलब्ध असतील तरी परिसरातील नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी केले आहे.