अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि ३ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने मुलीच्या राहत्या घरात सर्व झोपलेले असतांना तिला काही तरी फुस लावत व आमिष देत घरातून पळवून नेल्या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.संजय पाटील हे करीत आहेत.