पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत काल ठाकरे गटाचे नेते देसाई यांचे सुपुत्र शिंदे गटात दाखल झाल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय तर आज दुसऱ्या दिवशी भाजपने पुण्यात पुन्हा ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक राहिलेले श्याम देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केली आहे. मे महिन्यात उद्धव ठाकरे खुद्द पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे ही सभा महाविकास आघाडीच्या वतीने असणार आहे. मात्र त्याआधीच ठाकरे गटाला धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
देशपांडे हे पुणे महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी २०२२ मध्ये मुंबईतील एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती.पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांची मे २०२२ मध्ये हकालपट्टी केली होती. देशपांडे हे २०००-२०१२ या कालावधीत कोथरूड भागातून नगरसेवक होते. तर २००८-०९ मध्ये त्यांनी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता देशपांडे यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार याकडे लक्ष असेल.