जळगाव : प्रतिनिधी
धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या चार जिल्ह्यांत विस्तारलेल्या जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत ऍड. गुणरत्ने सदावर्तेच्या यांची एसटी कष्टकरी जनसंघ परिवर्तन पॅनलने कर्मचारी विकास आघाडीचा धुव्वा उडवीत १७ च्या १७ जागांवर विजय मिळवीला. विजया नंतर मतमोजणी ठिकाणी परविर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला होता. तसेच बस स्थानकाबाहेर देखील जल्लोष पॅनलतर्फे करण्यात आला.
जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत ऍड. गुणरत्ने सदावर्ते यांची एसटी कष्टकरी जनसंघाचे परिवर्तन पॅनलने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. पतसंस्थेच्या इतिहासात प्रथमच पारंपरिक विरोधक असलेल्या इंटक, कामगार संघटना व कामगार सेना या तीन भिन्न विचारांच्या संघटना या एकत्र येवून कर्मचारी विकास आघाडी तयार केली होती. चुरशिच्या झालेल्या या निवडणूकीत ९१ टक्के मतदान झाले होते. सोमवारी सकाळी ८ वाजेपासून जिल्हा बँकेच्या गणेश कॉलनी शाखेच्या हॉलमध्ये मतमोजणीला मतमोजणी सुरु झाली. दुपारपर्यंत सर्व जागांचे निकाल हाती येत ऍड. सदावर्ते यांची परिवर्तन पॅनलने या निवडणूकीत बाजी मारत १७ च्या १७ जागांवर विजय मिळवीत कर्मचारी विकास आघाडीचा धुव्वा उडवीला.
मातब्बरनां एकही जागा राखता आली नाही
कामगारांच्या हितासाठी ९ विचारसरणीनुसार वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात उभ्या राहणार्या तीन कामगार संघटना यंदाच्या निवडणुकीत प्रथमच एकत्र एका पॅनलखाली लढल्या. एसटी इंटक संघटना, कामगार संघटना व कामगार सेना या तीन प्रमुख संघटना एकत्र येत कर्मचारी विकास आघाडी तयार केली. त्यामुळे एसटी कष्टकरी जनसंघाचे परिवर्तन पॅनल अशी चुरशीची लढत निर्माण झाली होती. मात्र, मतदारांनी सदावर्तेच्या पॅनलला मतांचे भरघोस दान दिल्याने, या निवडणुकीत या तिन्ही मातब्बर संघटनांना एकही जागा राखता आली नाही.
परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार..
जितेंद्र सोमनाथ पाटील, देवेंद्र पंडित ठाकरे, रामराव डोंगरसिंग राठोड, पंडित वामन पाटील, समाधान संभाजी पाटील, निंबा पद्मसिंग राजपुत, डिंगबर सिताराम सोनवणे, नरेंद्रकुमार भगवान रायसिंग, राजेश मधुकर ठाकुर, प्रविण साहेबराव मिस्तरी, विनोद बनगर गवळे, दीपक रघुनाथ नागपुरे, चारूलत्ता ज्ञानेश्वर घरटे, शुभांगिनी बळीराम सोनवणे, अमोल सुधाकर सुरवडकर.