यावल : प्रतिनिधी
एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय महिलेचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकतर्फी प्रेमातून संशयिताने महिलेचा रस्ता अडवला. तसेच प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर महिलेने तत्काळ येथील पोलिस ठाण्यात धाव घेतली.त्यानंतर पोलीस ठाण्यात संबधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार अजिज शेख काम करीत आहेत.