Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दगडफेक प्रकरणी २९ जणांवर गुन्हा ; ६ जणांना अटक
    क्राईम

    दगडफेक प्रकरणी २९ जणांवर गुन्हा ; ६ जणांना अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 3, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील खंडेराव नगरातील आझाद नगर परिसरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ मुलीच्या छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली तर पोलीसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, शहरातील खंडेराव नगरातील आझाद नगरात शनिवारचा बाजार असतो. त्या बाजार आलेल्या एका मुलीची छेड काढल्याचा प्रकार  शनिवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडला. या मुलीच्या गटातील एकाने आझाद नगरातील प्रकाश किराणा दुकानाजवळ जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारी व दगडफेकीत झाले होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकातील पोहेकॉ संजय सपकाळे, पो.ना. सुशिल चौधरी, पो.ना. प्रविण जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस कर्मचारी परिस्थितीची माहिती घेत असतांना दानिश बालिक पिंजारी याने पोलीसांना शिवीगाळ केली.

    तर जमावातील नागरीकांनी रस्त्यावरील विटा व दगडफेक करण्यात आली होती. यात दोन कर्मचाऱ्यांना दुखापत झाली होती. तर दोन घरांचे नुकसान झाले होत. रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तातडीने घटनास्थळी पोलीसांचे कुमक बोलविण्यात आले होते. कुमक पथकाने जमाव पांगविला. आता तणावपुर्ण शांतता आहे.

    याप्रकरणी पोहेकॉ संजय सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दानिश बालिक पिंजारी, अशपाक खान, रमजान पिंजारी, रेहान शेख, समीर शेख सलीम, अज्जू चावल, अक्तर फरीक मोहमंद पिंजारी, अक्तर दिलेमान पिंजारी, समितर अमिर पटवे, संजय धनगर, सागर कपिल भोई, सनी उर्फ खंडू प्रेमनाथ उमप, राकेश अशोक भोई, विक्की अशोक भोई, विक्की मिठाराम भोई, नाना भोई, यशवंत भोई, बारकू संतोष भोई, समाधान भोई, मुश्ताक इंदू पिंजारी, इम्रान युनूस पिंजारी, गंभीर सरदार पिंजारी, अनिल युनूस पिंजारी, शाहीद रशिद पिंजारी, शाहरूख शेख पिंजारी, आवेश परीद पिंजारी, लखन संतोष भोई , बारकू उर्फ राम संतोष भोई आणि सादीक शेख मुनाफ या २९ जणांवर रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.