Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » या मतदार संघातून आठवले लढवणार निवडणूक !
    राजकारण

    या मतदार संघातून आठवले लढवणार निवडणूक !

    editor deskBy editor deskMarch 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. सध्या केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रामदास आठवले हे पराभूत झाले होते. असे असताना त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले, मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालो. मात्र मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे.

    तसेच भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करेन,असेही आठवले म्हणाले. यामुळे आता प्रत्यक्षात 2024 मध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामदास आठवलेंच्या वक्तव्याने आगामी लोकसभेत तिकीट वाटपावरून पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र आठवलेंच्या इच्छेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन वाढणार आहे. यामुळे काय निर्णय होणार हे लवकरच समजेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.