जळगाव : प्रतिनिधी
शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक 11 मार्च 2023 रोजी राज्यस्तरीय iNOVA- 2023 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये आयटी क्वीज व पावर पॉइंट प्रेझेंटेशन या स्पर्धा पदवी व पदव्युत्तर गटातून घेण्यात आल्या . राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अझरुद्दीन शेख रिजनल मॅनेजर क्विक हिल्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेख यांनी अँटीव्हायरस व सेक्युरिटी या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी अँटीव्हायरस चे महत्व तसेच क्विक हिल्स मधील विविध सेक्युरिटी आणि क्विक हिल्स चे विविध प्रॉडक्ट आणि फीचर्स यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी वाघुळदे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण . डॉ. मनीषा देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रा. स्वप्नाली वाघुळदे व डॉ. मनीषा देशमुख यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. या स्पर्धेचे विविध निकाल असे: आयटीक्विझ मध्ये पदवी विभागातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पदवी गणेश रवींद्र पाटील, अमृत सागर जयवर्धन ( एस एस व्ही पी एस महाविद्यालय धुळे) द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रोहित सिद्धार्थ सुरवाडे, घनश्याम दिलीप महाजन (एम जे कॉलेज जळगाव) यांनी प्राप्त केले. उत्तेजनार्थ: चिन्मय पाटील ( शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव) पदव्युत्तरविभागातून प्रथम क्रमांक दिपाली प्रभाकर पावरा (शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव) पावर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये प्रथम क्रमांक अमृतसागर जयवर्धन, गणेश रवींद्र पाटील ( एस एस व्ही पी एस कॉलेज धुळे) द्वितीय क्रमांक : दीपक बायस ( के सी ई इंजीनियरिंग कॉलेज जळगाव) उत्तेजनार्थ: प्रेरणा नेगी, भारत चौधरी ( जी एच रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव) कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रियंका बऱ्हाटे यांनी केले तसेच सूत्रसंचालन वैष्णवी पाटील आणि प्रज्ञा महाजन, तसेच आभार प्रा. प्रशांत सावदेकर, चिन्मय महाजन यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विभागातील प्रा. कुमुदिनी पाटील, दिपाली मराठे, भाग्यश्री पाटील , शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. पी आर चौधरी, डॉ. राजकुमार लोखंडे, योगिता भंगाळे, वर्षा आटे, उदय इंगळे , दीपक पाटील, संदीप पाटील तसेच विभागातील विद्यार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले.