Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बॉलिवूडवर पुन्हा शोककळा : माधुरी दीक्षितच्या आईचं निधन !
    क्राईम

    बॉलिवूडवर पुन्हा शोककळा : माधुरी दीक्षितच्या आईचं निधन !

    editor deskBy editor deskMarch 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    बॉलिवूड क्षेत्रातून एकामागून एक आघात होणारी बातमी समोर येत आहे. नुकतेच सतीश कौशिक यांच्या निधनानंतर मनोरंजन सृष्टीतून दुःखद घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचं निधन झालं आहे.

    त्यांच्यावर वरळी येथे अंत्यसंस्कार केलं जाणार आहे.माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं आज सकाळी साडे आठच्या सुमारास निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 3 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनातून इंडस्ट्री अजूनही सावरलेली नाहीय.
    दरम्यान आता आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. आईच्या जाण्याने माधुरी दीक्षित आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माधुरी दीक्षित आपल्या आईच्या अतिशय जवळ होती.

    माधुरी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी आईसोबत शेअर करत असे. या वयातही स्नेहलता नेहमीच हसतमुख चेहऱ्याने आपल्या लेकीसोबत प्रत्येक फोटोत दिसून येत होत्या.माधुरी सतत आपल्या आईसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असे. माधुरी दीक्षितचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या रिकु नाथ यांनी सर्वप्रथम स्नेहलता दीक्षित यांच्या निधनाची बातमी दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माधुरी दीक्षितच्या आई सस्नेहलता आता आपल्यात नसल्याचं सांगितलं होतं. शिवाय वृद्धपकाळाने त्यांचं निधन झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनतर अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपल्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.