• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात शतपावली करताना दोन महिलांच्या मंगलपोत लंपास !

जिल्हा पेठ सह रामानंद पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
March 12, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात शतपावली करताना दोन महिलांच्या मंगलपोत लंपास !

जळगाव : प्रतिनिधी 

जेवण झाल्यानंतर मुलासोबत शतपावली करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची तर दुसर्‍या घटनेत दुचाकीवरुन जात असलेल्या महिलेच्या गळ्यातून 50 हजारांची मंगलपोत लांबविल्याच्या दोन घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जळगावात घडल्या. दोघ घटनांमध्ये दुचाकीवरुन दोन चोरटे आले आणि त्यांनी मंगलपोत लांबविली. याप्रकरणी जिल्हापेठ व रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जिल्हा उद्योग केंद्रा मागील बाजूस असलेल्या प्रोफेसर कॉलनीत वंदना सुभाष पवार या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले आणि त्यानंतर ते मुलगा आर्यन सोबत शतपावली करण्यासाठी निघाल्या. जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील बाजूस पायी जात असतांना समोरुन दुचाकीवर दोन इसम तोंडाला काळ्या रंगाचा मास्क व डोक्यात टोपी घालून त्यांच्याजवळ आले. याचवेळी दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने वंदना पवार यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची पट्टीची मंगलपोत ओढून ते महामार्गाच्या दिशेने पसार झाले. पवार यांचा मुलगा आर्यन याने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पवार यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोघ घटना घडल्याने पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिल्पा पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी ताब्यात घेतले आहे.
शतपावली करणार्‍या महिलेची मंगलपोत लांबविल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या काही वेळाताच रुख्मिणी नगरातील समाजसेविकेच्या गळ्यातून सोन्याची चैन लांबविल्याची घटना घडली. या दोघ घटनांमध्ये साम्य असून त्यामधील चोरटे हे एकच असल्यााची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून या चोरटयांच्या मागावर असल्याच माहिती पोलिसांनी दिली. शहरातील रुख्मिणी नगरातील वंदना भगवान पाटील या समाजसेविका आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्या (एमएच 19 डीके 8876) क्रमांकाच्या दुचाकीने मुन्सिपल कॉलनीकडे जात होत्या. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाजवळून जात असतांना त्यांच्यादुचाकी समोर अचानक दोन दुचाकीस्वार तरुण आले. पाटील यांना ते तरुण टर्न घेत असल्याचे वाटल्याने त्यांनी त्यांची दुचाकी हळू केली.

हीच संधी साधत दुचाकीवरील मागे बसलेल्या चोरट्याने वंदना पाटील यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावून ते पळून गेले. दोघ चोरटे हे उंचपुर्ण आणि मजबुत बांद्याचे असून त्यातील एकाने अंगात काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. याप्रकरणी वंदना पाटील यांच्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद !

Next Post

बॉलिवूडवर पुन्हा शोककळा : माधुरी दीक्षितच्या आईचं निधन !

Next Post
बॉलिवूडवर पुन्हा शोककळा : माधुरी दीक्षितच्या आईचं निधन !

बॉलिवूडवर पुन्हा शोककळा : माधुरी दीक्षितच्या आईचं निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group