• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खडसेंना धक्का; जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी संजय पवार !

काही दिवसापूर्वी पालकमंत्री पाटील यांच्या सोबत व्यासपीठावर आलेले झाले अध्यक्ष !

editor desk by editor desk
March 11, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
खडसेंना धक्का; जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी संजय पवार !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीत बंडखोर उमेदवार संजय पवार विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर संजय पवार विजयी झाले आहे. संजय पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडे उमेदवारी मागितली होती. पण नंतर त्यांनी बंडखोरी केली. निवडणुकीवेळी शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटाच्या एका सदस्याने त्यांना पाठिंबा दिल्याने संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील शिंदे गट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील शेतकरीची बँक म्हणून नावाजलेली असलेली जिल्हा बॅकेत आज अध्यक्षपदासाठी निवडणूक होती. जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत. एकनाथ खडसे यांनी या सर्व घटनेवर भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे तसे संचालकांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. यात सर्वानुमते तसेच पक्षाचे श्रेष्ठी व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती जिल्हा बँकेत पुढील एक वर्षांसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होतं. मात्र, संजय पवार यांनी बंडखोरी केली होती.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे संजय पवार यांच्या नावाची चर्चा होती, मात्र एकनाथ खडसे तसे संचालकांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली, यात सर्वानुमते तसेच पक्षाचे श्रेष्ठी व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती जिल्हा बँकेत पुढील एक वर्षांसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं. आहे. त्यानुसार रविंद्र भैय्या पाटील यांनी अर्ज दाखल केला.

आयत्या वेळी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी संजय पवार यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला, त्यांना सुचक म्हणून शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील तर अनुमोदक म्हणून जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनी अनुमोदन दिलं होतं. दगडी बँक म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना (शिंदे गट) यांची संयुक्त सत्ता होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, शिवसेना शिंदे गटाचे पाच, कॉंग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, तर भाजपचा एक सदस्य आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आहेत. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे बँकेचे नेतृत्व आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला दोन वर्ष तर राष्ट्रवादीला तीन वर्ष असा अध्यक्षपदासाठीचा फार्म्युला ठरला होता. प्रत्येकी एक वर्षासाठी राष्ट्रवादीकडून नवीन व्यक्तीला अध्यक्षपद दिले जाईल असा असा निर्णय झाला होता. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने अध्यक्ष गुलाबराव देवकर व उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनी राजीनामा दिला होता.

जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्र वादी पक्षा कडून जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आल्याच्या घोषणे नंतर राष्ट्रवादी पक्षाच्याच संजय पवार यांनी ही शिंदे गटाची मदत घेत आपला उमेदवारी अर्ज भरल्याने जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला मोठी कलाटणी मिळाली होती, राष्ट्रवादी पक्षातच बंडखोरी झाल्याने आता गुप्त मतदान घेण्यात येत आलं त्यात संजय पवार अध्यक्ष झाल्यानं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

सणासुदीत सोन्यासह चांदीचे भावात होणार बदल !

Next Post

एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग !

Next Post
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group