Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज ठाकरेंना दानवेंनी दिले उत्तर म्हणाले…शापाने !
    राजकारण

    राज ठाकरेंना दानवेंनी दिले उत्तर म्हणाले…शापाने !

    editor deskBy editor deskMarch 11, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात नुकताच मनसेचा वर्धापन मोठ्या उत्साहात झाला यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानत राज्यातील सत्ताधारीपासून ते थेट विरोधकांना लक्ष केले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली होती. या टीकेला उत्तर लागलीच ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी दिले आहे.

    सत्ताधारी केंद्रातील भाजपला सुनावत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी थेट हल्ला चढवला. याचदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत टीका केली. राज ठाकरे यांनी राजकारणात दिवस तेच राहत नाहीत ते बदलत असतात असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही खोचकपणे टीका केली आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका करताना त्यांनी असे म्हटले की, माझ्या नादाला लागू नका, आता गेलं ना तुमचं मुख्यमंत्री पद म्हणत टीका केली. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करताना कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असं म्हटलं आहे. तसेच मनसे हा भाजपच्या दावणीला बांधला गेलेला आहे अशी ही टीका केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.