प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: शहरातील पारधी वाडा भागात दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी धरणगाव पोलीसांनी प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत असतांना गैर कायद्याने काही लोकांनी बसस्थानकासमोर रास्तारोको करण्यात आला होता. यात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कायद्याचे भंग केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा पोलीसांनी दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी ००.१५ वा चे दरम्यान पारधी वाडा, धरणगाव भागातील कही महीला व पुरुष धरणगाव पोलीस स्टेशनला त्यांचे आपसातील भांडणाची तक्रार देण्यासाठी आले होते. पोलीस ठाणे अंमलदार यांनी एका पार्टीची तक्रार घेण्यास सुरुवात केली असतानाच समोरी लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवुन पोलीस ठाण्यात निघुन बस स्टैंड समोर रोडवर बसुन रास्तारोको करुन अवैध दारु बंद करणेबाबत घोषणेबाजी करु लागले होते. आम्ही सदर घटनेची माहीती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो त्यावेळी रोडवर बसलेले लोकांना आम्ही समजविले तरी त्यांनी काही वेळ पर्यंत रस्ता रोको करुन नंतर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर आंदोलन करणा-या जमावाची तक्रार एकुण घेवून त्यांना कारवाईचे आश्वासन दिले.
दि.०१/१०/२०२१ व दि.०२/१०/२०२१ रोजी पारधी वाडा भागातील दारु विक्री करणारे यांचे घरी छापे मारण्यासाठी आमचे पथक रवाना केले. सदर पथकाने पारधी वाडा भागात अवैधरीत्या दारु कब्जात बाळगुन तिचे चोरटी विक्री करणारे १) रिना भगवान पवार, २) रत्नाबाई नाना पारधी, ३) राजेंद्र सुकलाल मराठे अशांवर मुंबाई दारुबंदी अधिनियमाअंतर्गत छापे टाकुन कार्यवाही करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे काही ठिकाणी दारु नाश करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कारवाया यापुढे धरणगाव पोलीस स्टेशन कडुन करण्यात येतील.
गैरकायद्याची मंडळी जमवुन त्यांना चिथावणी देवुन कायदा हातात घेवून रास्तारोको करणा-यां ७ लोक व इतर १५ ते २० अज्ञात लोकांविरुध्द देखील धरणगाव पोलीस स्टेशनला कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील जमावबंदीचे आदेश लागू आहेत.
तसेच कोविड १९ विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आपली काही तक्रार असल्यास आपण कायदा हातात न घेता सनदशीर मार्गाने मांडावी. तसेच कोणत्याही अवैध धंद्याबाबत आमच्याशी संपर्क केल्यास त्याची दखल घेण्यात येईल. गैरकायदेशीर कृत्य केल्यास यापुढे देखील त्यांचे विरुद्ध प्रचलित कायद्यान्वये दखलपात्र स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल असे धरणगाव पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे.