नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सोशल मीडियावर लग्नासंबंधीत नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी नवीन जोडपं स्वत: शेअर करतात. तस काही व्हिडीओ हे कुटुंबीय देखील शेअर करतात. हे व्हिडीओ लग्नातील मजेदार क्षणांचे असतात. तर काही व्हिडीओ हे नवरा-बायकोच्या ग्रँड एन्ट्रीचे असतात. पण सध्या लग्नासंबंधीत एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर आपलं लग्न ठरल्यापासून एक मुलगी आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहू लागते.
तिच्यासाठी ही नवीन सुरुवात असते. नवीन लोक, नवीन गोष्टी या सगळ्यात ती दंग असते. पण विचार करा की एका मुलीचं स्वप्न तिच्या लग्नादिवशीच तुटलं तर? त्या मुलीला कळालं की आपण जे स्वप्न पाहात आहोत, ते आता मोडलं आहे, तर? ज्या गोष्टीबद्दल विचार करणं देखील कठीण आहे, असाच प्रकार एका महिलेसोबत घडला. खरंतर लग्नाच्या दिवशी एका नववधूने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत पाहिलं, ते ही अर्ध नग्न अवस्थेत. आपला होणारा नवरा आपली फसवणूक करत आहे, हे समजताच नववूला राग आनावर झाला.
ती चिडली आणि रडत रडत तेथून पळून गेली. नक्की काय घडलं? या लिंकवर क्लिक करुन पाहू शकता व्हिडीओ व्हिडीओच्या सुरुवातीला नववधू रडताना दिसत आहे. तेव्हा ती एका गाडीच्या खिडकीतून जोरजोरात ठोकते.
तेव्हा आतमध्ये तिचा होणारा नवरा एका तरुणीसोबत होता, तो ही अर्ध्या कपड्यात. त्यानंतर तरुणी तेथून रडत जाते. तिच्या मागून काही लोक देखील पळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स देखील केले आहे.