Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेता चढला बोहल्यावर !
    राज्य

    वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेता चढला बोहल्यावर !

    editor deskBy editor deskMarch 9, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आले. सेलिब्रिटींची भांडणं, मैत्री, प्रेम…इत्यादी गोष्टी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. काही कलाकारांनी तर स्वतःच्या नावाचा ठसा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील नोंदवला आहे. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेते कबीर बेदी. बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत काम केलेले अभिनेते कबीर बेदी त्यांच्या करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कबीर बेदी यांनी चार लग्न केली, ज्यामुळे त्यांना अनेकदा टीकेचा देखील सामना करावा लागला.
    कबीर बेदी यांनी स्वत: त्यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल: द इमोशनल लाइफ ऑफ द ऍक्टर’ या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से शेअर केले आहेत. कबीर बेदी यांच्या चौथ्या पत्नीबद्दल, त्यांची मुलगी पूजा बेदीने अशी काही प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे कबीर यांचं चौथं लग्न आणि लेकीने केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आलं.

    कबीर बेदी यांचे पहिलं लग्न नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांच्यासोबत झालं होतं. कबीर आणि प्रोतिमा यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव पूजा बेदी, तर मुलाचं नाव सिद्धार्थ असं होतं. लग्नानंतर दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कबीर यांनी दुसरं लग्न केलं.

    कबीर बेदी यांनी दुसरं लग्न ब्रिटिश मॉडल सुसैन हम्फ्रे हिच्यासोबत केलं. पण दोघांचं नातं देखील अधिक काळ टिकलं नाही. त्यानंतर अभिनेत्याने तिसरं लग्न अभिनेत्री निक्की बेदी हिच्यासोबत केलं. पण दोघांनी देखील फार कमी दिवसांत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशाच चौथ्या लग्नानंतर अभिनेत्याला टीकेचा सामना करावा लागला.

    कबीर बेदी याचं चौथे लग्न मॉडेल परवीन दोसांझ हिच्यासोबत झालं. वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेत्याने २९ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कबीर बेदी यांची चौथी पत्नी मुलगी पूजा बेदीपेक्षा चार-पाच वर्षांनी लहान आहे. पूजा आणि परवीनचे अजिबात पटत नसल्याचं देखील अनेकदा समोर आलं. एकदा पूजा बेदी सावत्र आई परवीन हिच्याबद्दल वक्तव्य केलं ज्यामुळे अभिनेत्याचं चौथं लग्न तुफान चर्चेत आलं. वडिलांच्या चौथ्या लग्नानंतर पूजा म्हणाली होती की, ‘प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी सावत्र आई असतेच… आता माझ्यापण आली आहे…’, कबीर बेदी आणि परवीन यांची लंडनमध्ये एका नाटकादरम्यान भेट झाली होत. त्यानंतर या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.