धरणगाव : प्रतिनिधी
भवरखेडे या गावाला शेती तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या होती. या बाबत गावाच्या नदीला धरणाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील यांच्याकडे मागणी केली होती. अखेर गिरणा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून आहे.गावकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मान्य आहे.
भवरखेडे ग्रामस्थांचा गिरणा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे याबाबत पालकमंत्री पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. ग्रामस्थांची मागणी तात्काळ समजून घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाटबंधारे खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून भवरखेडे पर्यंत पाणी सोडण्यात यावे,अशा सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
तीन दिवसा अगोदर धरणातून सोडले पाणी
ग्रामस्थांच्या या पाठपुराव्याला यश आले असून गिरणा धरणाच्या डाव्या कालव्यातून भवरखेडा पर्यंत धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून पाण्याचा प्रवाह हा तीन दिवसा अगोदर करण्यात आला होता. सर्वे विटनेर, सांगवी, पळासखेडा या गावांपर्यंत पाणी पोहोचले होते. ८ मार्च रोजी अखेर भवरखेडा पर्यंत हे पाणी पोहोचवण्यात आले आहे. त्यामुळे भवरखेडा येथील शेतकरी व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
पाच गावांना होणार फायदा
गिरणीतून आलेल्या या पाण्याचा सर्वे, सांगवी, विटनेर,पळासखेडा व भवरखेडा गावाच्या शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. याबद्दल भवरखेडे ग्रामपंचायत कमिटी तसेच गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.