जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात ४२ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष देत तसेच काही ही कारणाने पैसे घेवून फसवणूक करीत महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात ४२ वर्षीय महिला परिवारासोबत वास्तव्यास आहे. दि २३ मार्च २०१७ पासून ते दि ३० मे २०१९ पर्यत संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेगडे याने महिलेला लग्नाचे आमिष देत तब्बल तीन वर्ष शारीरिक संबध ठेवत तिच्याकडून काही ना काही कारणाने पैसे मागून फसवणूक केली आहे. या प्रकरणी महिलेने रामानंद नगर पोलीस स्थानक गाठत संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेगडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.