मुक्ताईनगर : प्रतिनिधी
धुलीवंदनच्या दिवशी चिंचखेडा खुर्द येथे शेतामध्ये वन्य प्राणी सायाळ याची शिकार करून त्याचे मास शेतमधील शेड मध्ये शिजतवत असताना वनविभागाने मंगळवारी कारवाई केली. या प्रकरणी चार जणांना त्याब्यात घेतले असून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम वन गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
धुलीवंदनच्या दिवशी 7 मार्च रोजी दुपारी वन विभागाला गुप्त माहिती मिळाली. की मौजा चिचखेडा येथील शेतकरी सुपळा रामचंद्र मेनकर रा. चिचखेडा खुर्द यांच्या शेतामध्ये वन्यप्राणी सायाळ ची शिकार करून कापत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लगेच घटनास्थळी सचिन ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी, वडोदा ल सोबत वन कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान शेतामध्ये रक्ताने माखलेली काठी, जमिनीवर पडलेले रक्त, वन्य प्राणी सायाळ चे चार पंजे व व अर्धवट जळलेल्या स्थितीत वन्य प्राणी सायाळचे काटे दिसून आले. लगेच घटनास्थळी शेतकरी सुपळा मेनकर यांना ताब्यात घेऊन विचारपूस व चौकशी केले असता शंकर साहेबराव सपकाळ व ऋषिकेश सुरेश अहिरकर रा. चिचखेडा यांच्या शेतातील शेडमध्ये वन्य प्राणी सायाळचे मांस चुलीवर अर्धवट शिजलेले आढळून आले. तसेच चौकशीमध्ये निवृत्ती उर्फ बाबुराव रामचंद्र मेनकर रा. चिचखेडा यांना ताब्यात घेतले असून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग, उमेश बिराजदार सहायक वन संरक्षक, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा, श्रीमती मराठे वनपाल, पाचपांडे वनपाल, ज्ञानोबा धुळगंडे वनरक्षक, राम असुरे वनरक्षक, बापूसाहेब थोरात वनरक्षक, गोकुळ गोसावी वनरक्षक, अशोक तायडे वनमजूर, अशोक पाटील वनमजूर व इतर वनमजूर यांनी कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.