नाशिक : वृत्तसंस्था
आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. . या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात जाऊ. तसेच, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातच जामिनासाठी अर्ज करणार आहे, अशी माहिती या निकालानंतर आमदार बच्चू कडू यांनी दिली. न्यायालयाच्या निकालानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच शिवीगाळ केली होती. यावर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुढील घटना थांबवली आणि कडू यांना ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. यानंतर आता न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.