Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पोलिसांना रंग लावत दिव्यागांनी उधळले माणुसकीचे रंग!
    जळगाव

    पोलिसांना रंग लावत दिव्यागांनी उधळले माणुसकीचे रंग!

    editor deskBy editor deskMarch 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील रुशील मल्टीपर्पज फाउंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सालाबादाप्रमाणे यंदा देखील पर्यावरण पूरक होळीचे दहन आणि हवन करण्यात आले. काव्यरत्नावली चौकात पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. होळीनंतर दिव्यांग बालकांनी पोलीस अधीक्षक आणि इतर पोलिसांना रंग लावत आनंद साजरा केला.

    काव्यारत्नावली चौकात उडानतर्फे दरवर्षीप्रमाणे पर्यावरण पूरक होळीचे दहन करण्यात आले. झाडांचा पालापाचोळा टाकून होळी दहन करण्यात आले. तसेच होम हवन करीत त्यात विविध प्रकारच्या आहुती, कापूर, अत्तर, धूप, लोभान आणि इतर साहित्य टाकून हवन करण्यात आले. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले. प्रसंगी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी व गतीमंद बालकांनी पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले.

    दिव्यांग आणि गतीमंद बालकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी उडान राबवित असलेले उपक्रम कौतकास्पद आहेत. आज होळी सारख्या सणाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक होळी तसेच नैसर्गिक रंगाची उधळण करीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. आजच्या उपक्रमांतून इतर देखील बोध घेतील. दिव्यांग आणि गतीमंद बालकांच्या उपक्रमासाठी आमचे सदैव सहकार्य असेल, असे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सांगितले.

    गतीमंद बालकांनी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार तसेच इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना नैसर्गिक रंग लावत आनंद साजरा केला. पोलीस अधीक्षकांनी देखील बालकांना रंग लावत सेल्फी काढले. उपक्रमासाठी उडानचे महेंद्र पाटील, जयश्री पटेल, प्रतिभा पाटील, खुशबू महाजन, सोनाली भोई, प्रा.आर.बी.गुजराथी, हेतल पाटील, चेतन वाणी, जकी अहमद यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा मृत्यू; हलगर्जीपणाचा आरोप, जळगावात खळबळ

    March 25, 2026

    कामावर जाताना काळाने गाठले; अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

    March 25, 2026

    मैत्रीचा फायदा घेत तरुणीला हॉटेलमध्ये संबंधाची मागणी

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.