धरणगाव : प्रतिनिधी
गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरीचे चांगलेच नुकसान केले होते. यावर तोडगा म्हणून जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र जी.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी थेट शेतकरीच्या शेतात जावून पाहणी केली आहे. तर जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात तात्काळ पंचनामेचे आदेश जिल्हाधिकारीसह तहसीलदार यांना दिले आहे.
धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झालेल्या शेती पीक गहू , मका, बाजरी, दादर अन्य पिकांची नुकसानीची पाहणी करतांना जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्यामुळे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी तहसीलदार व कलेक्टर साहेबांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार लगेच पंचनाम्यांना सुरुवात झाली असून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आज धरणगाव तालुक्यात सकाळ पासून विविध गावांना जाऊन शेतीचे जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी केली या वेळी उपस्थित नितीन पाटील, पप्पू पाटील, माजी सरपंच आबा पाटील, निलेश मराठे, समाधान मराठे , विनोद मराठे , तुषार पाटील, आबा माळी, नितीन बिर्ला याच्या शेतात जाऊन पाहणी केली