Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनसे नगरसेवकाच्या मुलाला या प्रकरणात मागितली खंडणी !
    क्राईम

    मनसे नगरसेवकाच्या मुलाला या प्रकरणात मागितली खंडणी !

    editor deskBy editor deskMarch 8, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था 

    पुण्यातील मनसे नेते व नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाख रुपयांची खंडणी अज्ञातांनी मागितली होती. सोबतच खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकीही दिली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    रुपेश मोरेला खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी दिल्यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली दरम्यान या प्रकरणी मुंबईतून एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही जण असण्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत सद्रक्षणाय खलनिग्रहणाय…कानुन के हाथ बहुत लंबे होते है! धन्यवाद…भारती विद्यापीठ पोलीस, असं म्हटलं आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजता, रुपेश मसंत मोरे, (वय २५ वर्षे, धंदा हॉटेल व्यवसाय, रा. कात्रज गावठाण) दैनंदिन काम उरकून घरी जात असतानाच अज्ञात मोबाईल वरुन हाँटस अप वर मेसेज आला होता. त्या मध्ये रुपेश यांचा एका मुलीसोबत विवाह झालेबाबतचे नोंदणीचे प्रमाणपत्राचा फोटो होता. व त्या खाली लिहिले होते. “हमने आपके नाम का मॅरेज सटीफिकेट बनाया है, खराडी ऑन आयटी पार्क के सामने इनोव्हा मे २० लाख रुपये रख देना, पोलीस कम्प्लेट किया और इनोव्हा सील हुआ तो देख लेना क्या करते है आपके साथ, और पुलीस कम्लेट करके कुछ नही होने वाला, इम्तीयाज चाचा ने पहीले से सब सेटींग करा है, पुरी चंदननगर पोलीस स्टेशन मॅनेज कर दी है.” असा धमकीचा मेसेज होता. रुपेश यांनी त्याकडे ओके म्हणून दुर्लक्ष केले. त्यानंतर कोणाचा फोन व मेसेज आला नाही. मात्र त्यानंतर तुलाच पैसे देण्यासाठी यावेच लागेल असे सांगून त्या ने रुपेश ला दोन तीन दिवस वारंवार मेसेज करून त्रास दिल्या नंतर रुपेशने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.