प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: बिलखेडा येथे आत्मा अंतर्गत कौशल्याधारित प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम प्रसंगी आत्मा उपप्रकल्प संचालक जळगाव तडवी साहेब शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले.
कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ वैभव सूर्यवंशी, तालुका कृषि अधिकारी कुऱ्हाडे साहेब , अरुण कोळी साहेब, सर्ग समिती अकोला प्रतिनिधी नितीन वारके, गावाचे सरपंच बंडू काटे, मंडळ कृषी अधिकारी किरण देसले, कृषी सहाय्यक दिलीप ठाकरे, कापूस ग्रेडर एस. एस. पाटील, राहुल पाटील गावातील प्रगतिशील शेतकरी देविदास भदाणे गुरुजी, बापू सर, कृष्णा काटे, भाऊसाहेब भदाणे, दिपक भदाणे, पोलिस पाटील, संभाजी काटे, गोपाल भदाणे इ. उपस्थित होते. नितीन वारके यांनी सेंद्रिय शेती सेंद्रिय निविष्ठा तयार करणे व त्याचा वापर याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सूर्यवंशी साहेब यांनी फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा बिटीएम दिपक नागपुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार देविदास भदाणे यांनी मानले.