Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मसाजच्या नावाखाली सुरु होता असा उद्योग !
    क्राईम

    मसाजच्या नावाखाली सुरु होता असा उद्योग !

    editor deskBy editor deskMarch 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था 

    नाशिकच्या उच्चभ्रू ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अड्डा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उध्वस्त केला. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शरणपूर रोड वरील सुयोजित मॉडर्न पॉईंट या इमारतीत अनेश अरुण उन्हवणे याने 2 गाळे भाड्याने घेऊन तेथे योग वेलनेस स्पा या नावाने मसाज पार्लर सुरू केले होते. या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांना मिळाली होती.

    या माहिती वरून मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. तेथे एक महिला व ललित पांडुरंग राठोड हे दोघे महिलांना पैशांचे प्रलोभन देऊन अनैतिक देह व्यापाराचा व्यवसाय करताना मिळून आले. तेथे 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी महिला व ललित राठोड दोघांना हा व्यवसाय करताना गाळा मालक अनेश उन्हवणे तसेच गाळा भाड्याने उपलब्ध करून देणारे सागर ओमकार अग्रवाल व पियुष ओमकार अग्रवाल या सर्वांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.