अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून अनोळखी चोरट्याने एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गुरुकृपा कॉलनी परिसरातील रहिवासी दीपक कनीराम जाधव यांच्या मालकीची असलेली दुचाकी क्र.एम.एच.१२.ई.डी.४२३८ हि त्यांच्या घराच्या अंगणात लावलेली असतांना अनोळखी व्यक्तीने दि ५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमास चोरून नेल्याप्रकरणी अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेका.चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.