गरजू रुग्णांना होणार मोफत औषधी वाटप
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे रविवारी दि. 3 ऑक्टोबर रोजी भादली येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तपासणी नंतर गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे. भादली पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायराॅइड, लहान मुलांचे आजार, महिलांचे गर्भपिशवीचे आजार व मासिक पाळी संबंधीच्या समस्या, महिलांच्या स्तनाचे आजार, मानेचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध व भगंदर, आतड्यांचे आजार, अशक्तपणा व चक्कर येणारे आजार, डोळ्यांच्या लालसरपणाचे आजार, नजर कमी होणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यांचे इतर आजार व मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, स्नायुंचे दुखणे, गुडघे व सांधेदुखी, रक्ताचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीअंती आढळून आलेल्या रुग्णांना आवश्यक औषधे देखील दिली जाणार आहे.
शिबिरात तपासणी करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. अनुश्री व्ही (एमडी फिजिशियन) डॉ. वैभव गिरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. श्रीराम महाजन (प्लास्टिक सर्जन), डॉ. तेजस पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. स्वप्नील गिरी (बालरोग तज्ञ), डॉ. नीरज चौधरी (मूत्रविकार तज्ञ), डॉ. रश्मी पाटील (नेत्ररोग तज्ञ), डॉ. मंजू पवार (नेत्ररोग तज्ञ) डॉ. प्रियंका चौधरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. समीर चौधरी (जनरल सर्जन), डॉ अमित नेमाडे (फिजिओथेरपिस्ट), डॉ. भूषण चव्हाण (दंतरोग तज्ञ),. डॉ. अनंत पाटील (एमडी आयुर्वेद) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत देवकर हॉस्पिटलचा प्रशिक्षित स्टाफ असणार आहे. या शिबिराचा भादली व परिसरातील गावांच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. संपर्कासाठी डॉ. नितीन पाटील मो क्र 7507724200 & 9422977071 वर कॉल करावा.