Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतकरीच्या समोर उभा ठाकला सनी देओल अन बसला धक्का !
    राज्य

    शेतकरीच्या समोर उभा ठाकला सनी देओल अन बसला धक्का !

    editor deskBy editor deskMarch 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : वृत्तसंस्था 

    अनेक कलाकारांना ज्यावेळी आपण पाहतो तेव्हा त्यातल्या किमान एखाद्या चेहऱ्याला तरी प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा मनी बाळगतो. बरं हे शक्य होणार नाही असंच आपलं मत असतं. पण, ते म्हणतात ना; नियतीत असेल तर काहीही शक्य होतं. अगदी जगाच्या टोकावर असणाऱ्या व्यक्तीचीही तुम्हाला भेट घडून येते. एखादा कलाकारही असाच योगायोगानं तुम्हाला भेटतो. किंवा भेटूही शकतो. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ आताच पाहा.

    हा व्हिडीओ शेअर केला आहे खुद्द अभिनेता सनी देओल यानं. वय वाढत असलं तरीही शारीरिक सुदृढतेच्या बळावर सनी देओल नव्या जोमाच्या कलाकारांनाही लाजवत आहे. सध्या तो आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याचदरम्यान घडलेला एक प्रसंग सनीनं चाहते आणि फॉलोअर्सच्या भेटीला आणला.

    सनीनं शेअर केलेला व्हिडीओ आणि त्यात दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या साधेपणामुळं सर्वांच्याच मनात घर करत आहे. अहमदनगरमध्ये चित्रीकरण करताना एके संध्याकाळी रस्त्यावरून बैलगाडी हाकत एक शेतकरी काका पुढे जात अतानाच सनी तिथं येतो असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांची भेट होते, गप्पाही होतात. तरीही हा अभिनेता आहे याची कल्पनाही काकांना येत नाही.

    ‘तुम्ही सनी देओलसारखे दिसता… ‘ असं ते काका अतिशय समंजसपणे सनीला संबोधून म्हणतात आणि तो हळूच हसतो, पुढे म्हणतो, ‘हो तो मीच आहे…’. बस्स, आपल्या समोर खुद्द सनी देओल उभा आहे हे पाहून ते काकाही नि:शब्द झाले. ‘अरे बाप रेss’, इतकीच काय ती प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंदच सर्वकाही सांगून गेला. तर, या कानाकोपऱ्यातील चाहत्यांना भेटून आणि त्यांचा खरेपणा पाहून सनी देओलही भारावला. असा हा व्हिडीओ आजच्या दिवसातील सर्वात BEST VIDEO म्हणावा लागेल… नाही का?

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २० वर्षीय तरुणीचा मृतदेह रिक्षातून आढळला; पालकांचा धक्कादायक दावा

    February 20, 2026

    मविआत राज्यसभा–विधान परिषद जागांवरून जागांवरून तणाव शिगेला; ठाकरे–काँग्रेसमध्ये रस्सीखेच

    February 20, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.