• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रेम झाले अन सुनेला घेवून पळाला सासरा !

editor desk by editor desk
March 6, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
प्रेम झाले अन सुनेला घेवून पळाला सासरा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

प्रेमाला मर्यादा किंवा बंधन नसतं. यामुळेच ‘प्रेम आंधळं असतं’ असं लोक म्हणतात पण प्रेमात तुम्ही किती मर्यादा ओलंडता, हेदेखील महत्त्वाचं ठरतं. प्रेमाचे काही नियम आहेत का? आम्‍ही तुम्‍हाला एका घटनेबद्दल सांगतो, जिच्‍याबद्दल ऐकून तुम्‍ही हैराण व्हाल. राजस्थानमध्ये एका व्यक्तीने आश्चर्यकारक गोष्ट केली. तो व्यक्ती आपल्या मुलाच्या पत्नीसह पळून गेला.जेव्हा लोकांना हे समजलं तेव्हा सगळेच शॉक झाले.

इतकंच नाही तर सुनेला सहा महिन्यांची एक मुलगीही होती, जिला ते घरीच सोडून गेले. महिलेच्या पतीने आता या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली. ज्यात एक व्यक्ती आपल्या सुनेच्या प्रेमात पडला आणि तो तिच्यासोबत पळून गेला. वडील पत्नीसह घरातून निघून गेल्याचं मुलाला समजताच त्याने पोलिसांना माहिती दिली. वडिलांनी पळून जाण्यासाठी दुचाकी चोरल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुंदी जिल्ह्यातील सिलोर गावातील ही घटना आहे. पीडित पवन वैरागी यानी वडील रमेश वैरागी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पवनच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांनी पत्नीला त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत नसल्याचा दावा पवनने केला. पवनला सहा महिन्यांची मुलगी आहे. रमेशचा यापूर्वीही बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभाग असल्याचा दावा त्यानी केला. पवनचा दावा आहे की त्याच्या वडिलांनी त्याची गाडी चोरली आणि पत्नीला घेऊन गेले. शिवाय, त्याने दावा केला की त्याचे वडील आपल्या पत्नीची फसवणूक करत आहेत आणि ती निर्दोष आहे. पवनने मान्य केलं, की आपल्या कामामुळे तो गावापासून दूर राहात असे. सदर पोलीस ठाण्याचे प्रमुख अरविंद भारद्वाज यांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचं सांगितलं. अधिकारी अरविंद पवनला आश्वासन देतात की तपास सुरू आहे आणि जोडप्याचा आणि त्यांच्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या ठावठिकाणाबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही नवीन माहिती दिलेली नाही.

Previous Post

रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

Next Post

बापरे : १२ दुचाकीसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

Next Post
बापरे : १२ दुचाकीसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

बापरे : १२ दुचाकीसह दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group