लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र बो येथे शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारे वाटप करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार पंचायत समिती सभापती माननीय मान्यवरांसह शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज सकाळी शिरसोली प्र.बो.येथे आयोजित मोफत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उतारा वाटपाचा विशेष मोहिमेच्या शुभारंभ जळगाव उपविभागीय अधिकारी महेश सुधोळकर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव तहसीलदार नामदेवराव पाटील ,नायब तहसीलदार विशाल सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील व शिरसोली प्र.बो.चे सरपंच प्रदीप पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत डिजिटल सातबारा उताऱ्याचे वितरण शिरसोली प्र.बो.ग्रा.प.सद्स्य व नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व उपस्थित शेतकरी बांधव तसेच नागरिकांना आपल्या जळगाव तालुक्याचे कर्तृत्वदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे असे जळगाव तहसीलदार नामदेवराव पाटील यांनी संबोधित केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिरसोली मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे शिरसोली तलाठी नन्नवरे आप्पा व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.