मुंबई : वृत्तसंस्था
प्रत्येक व्यक्तीला काही तरी व्यसन जडलेले असते. पण कुठलेही व्यसन चांगले नसते हे माहित असतांना हि अनेक लोक व्यसनाच्या आहारी गेलेलं असतात. अशीच एक धककादायक घटना गुजरातमधील राजकोटमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील एका तरुणाने धुम्रपान केल्यानंतर आपला आवाज गमावला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गायी चारण्यासाठी आलेल्या या व्यक्तीला अज्ञात लोकांनी ही सिगारेट दिली होती. एका वृत्तानुसार पीडित व्यक्तीवर गुजरातमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. सिगारेट प्यायल्यानंतर तरुणाची वाचा गेल्याच्या वृत्ताने स्थानिक लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. धुम्रपान करण्याचे दुष्परिणामांवर (Side effects of smoking) मागील बऱ्याच कालावधीपासून संशोधन सुरु आहे. धुम्रपान केल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण होतात आणि त्याचा प्रकृतीला त्रास होता असं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. मात्र धुम्रपान केल्याने एखाद्या व्यक्तीचा आवाज गेल्याची ही घटना दुर्मिळ आहे.
सिगारेट ओढल्याने आवाज गेल्याचा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. सर्वोदय रुग्णालयातील संशोधन केंद्रामधील वरिष्ठ समोपदेशक, इंटरनल मेडिसिन स्पेशलिस्ट आणि जनरल फिजिशियन डॉ. सुमित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “बराच काळ धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा गळा खराब होऊ शकतो. मात्र या प्रकरणामध्ये रुग्णासंदर्भातील अधिक माहिती घेणं आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या सिगारेटने थेट आवाज जात नाही. याचे अनेक दुष्परिणाम आहेत. मात्र लॅरिंक्सवर (स्वरयंत्र) एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रभाव पडल्याचं दिसत नाही.”
संशोधनामध्ये असंही दिसून आलं आहे की धुम्रपानामुळे फोनेशनचा कालावधी कमी होतो. फोनेशन म्हणजे एकदा श्वास घेतल्यानंतर पुन्हा श्वास घेण्यादरम्यानच्या वेळात किती शब्द बोलता येतात ही क्षमता. या संशोधनामध्ये असंही दिसून आलं आहे की पल्मनरी फंक्शनिंग कमी होते. म्हणजेच श्वास घेणं आणि सोडण्याच्या कालावधीमधील समतोल. डॉ. अग्रवाल यांनी दिर्घकाळ धुम्रपान केल्यास व्होकल कॉर्डला सूज येते. धुम्रपानामुळे कॅन्सरचा धोकाही वाढतो.