बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ४३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात बोदवड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात ४३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि २ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास एक ३२ वर्षीय तरुण महिलेच्या घरात घुसत महिलेला झोपेतून उठवीत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.सचिन चौधरी हे करीत आहेत.



