• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

या कारणासाठी मनसे नेत्यावर हल्ला ; आरोपींनी दिली कबुली !

editor desk by editor desk
March 4, 2023
in क्राईम, राजकारण, राज्य
0
या कारणासाठी मनसे नेत्यावर हल्ला ; आरोपींनी दिली कबुली !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना मास्क लावून आलेल्या तिघांनी स्टम्प व बॅटने हल्ला केल्याची घटना शिवाजी पार्क येथे घडली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी आठ पथके तैनात करण्यात आली असून पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये, एक आरोपी हा शिवसेनेच्या माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असून काही दिवसांपूर्वीच त्याने शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर होत असलेल्या टिकेमुळेच हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिलीय.

संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींचा शोध घेतला. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दोघेही भांडुप मधील रहिवाशी आहेत. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे असल्याचं समोर येतय. यातील एका व्यक्तीचे नाव अशोक खरात असून हा शिवसेनामहाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचा उपाध्यक्ष आहे. भांडुपच्या कोकण नगर विभागचा तो रहिवासी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याने ठाकरे गटात प्रवेश केला होता. तर दुसरा सोलंकी नामक व्यक्ती ही त्याचाच सहकारी असल्याचे समजते आहे. आज सकाळी भांडुप येथील त्यांच्या राहत्या घरातूनन त्यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, खरातविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत तो शांत होता. आता, खरातचे शिवसेना नेत्यांसमवेतचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत. पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरातील अनेक ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेतला. त्यामध्ये, आरोपी सदर ठिकाणाहून पलायन करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर, दोघांना ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे.

Previous Post

पती पत्नीच्या वादामुळे परिवारातील सात जणाचे गेले प्राण !

Next Post

बापाची होती मुलीवर नजर ; आईने प्रियकारच्या मदतीने केले धक्कादायक !

Next Post
बापाची होती मुलीवर नजर ; आईने प्रियकारच्या मदतीने केले धक्कादायक !

बापाची होती मुलीवर नजर ; आईने प्रियकारच्या मदतीने केले धक्कादायक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group