Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खडसेंचा राग येत नाही कीव येते ; आ गिरीष महाजन
    जामनेर

    खडसेंचा राग येत नाही कीव येते ; आ गिरीष महाजन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 2, 2021No Comments5 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : खडसे साहेब अनेक दिवसांपासून बेछूट आरोप करीत आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी विविध आरोप केले आहेत आर्थिक विषय असतील वेगवेगळ्या विषयांवर असतील नियमित त्यांचे बोट जामनेर कडे दाखविले आहे मात्र ते कधीच नाव घेत नसायचे त्यांचा इशारा सर्वांना समजायचं मात्र त्यांनी खोटे गुन्हे दुःख दाखल करण्यापर्यंत मजल गेली व मौका लावण्याचाही प्रयत्न केला गेला यामुळे मला त्यांचा राग नाही कीव येते त्यांची इतकी केविलवाणी परिस्थिती झाली की राष्ट्रवादीत गेले मंत्री होणार पण साधे आमदार होतानाही आले असाही टोलाआ गिरीश महाजन यांनी यावेळी लगावला.


    पत्रकारांशी संवाद साधताना आमदार गिरीश महाजन म्हणाले की त्याची परिस्थिती किती केविलवाणी  झाले की मतदारसंघात मुलीने सपाटून मार खाल्ला राष्ट्रवादीत गेले तेथे मंत्री नाही तर साधे आमदार ही झाले नाही त्यांचे कुणी ऐकून घेत नाही अशा वेळेस कोणीही असो तो माणूस भेटल्या सारखच करणार
    पूर्वीसुद्धा त्यांना वाटेल तसे बोलायचे लेव्हल सोडून बोलत असत स्थानिक आमदार असो त्या माझ्यावर असो की  वरिष्ठ नेत्यांवर असो त्यांचा नेहमीचा तो सुटलेला असायचा त्याचा काल पुन्हा त्यांनी माझ्यावर बाराशे कोटी ची प्रॉपर्टी असल्याचा आरोप केला माझं त्यांना सांगणे आहे  की सरकार त्यांच्या पक्षाचे आहे आपले खूप वजन आहे आपण खोटे गुन्हे दाखल करू शकतात मोका लावण्याचा प्रयत्न सुरू आहे आपण त्यांना सांगून माझी चौकशी करावी म्हणजे माझ्याकडे काय प्रॉपर्टी आहे हे पाहावे असे त्यांनी खडसे  यांना आव्हान दिले.

    माझी गावालगत 32 एकर जमीन होती येणे झाल्यावर तिला काय भावाला किती पैसे मिळाले हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे असे म्हणत ते म्हणाले की खडसे म्हणतात मोटरसायकल व जीप मध्ये  राकेल टाकून मी फिरत असे मग त्यांच्या कडे  100 पेक्षा अधिक उतारे आले कुठून ही प्रॉपर्टी आली कुठून आपण रॉकेल टाकून आणली शेती करून असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

    मात्र आपण आज बघतोय ती शेतकऱ्याची अवस्था काय झाली आहे असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला मग खडसेंनी अशी कोणती शेती करीत आहेत की एवढ्या प्रॉपर्टी झाल्यात की पुणे मुंबई नाशिक या ठिकाणी घरदार शेती जमीन आहे मग हाच प्रश्न त्यांना आहे आपण ज्या दिमाखात विधानसभेत गर्जना केली होती की माझं काय चुकलं माझं काय अपराध आहे माझी चूक नाही मग  आपण इकडेतिकडे पडण्यापेक्षा त्याला सामोरे जावं आणि दूध का दूध पाणी का पाणी करावे ना की तीन तीन वेळेला कोरोना करून घेऊ नये असाही टोला त्यांनी लगावला.

    खडसेंच्या हिमतीची दाद द्यावी लागेल चार महिन्यापासून जावई जेल मध्ये आहे वहिनी साहेबांच्या नावाने समन्स निघाले आहे  घरावर समन्स डकवले जात आहे मात्र हे पुन्हा आपण बेछूट आरोप समोरच्या करीत आहेत आपण किती स्वच्छ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आहे  एकदाचे दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या असे आवाहन यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी दिले माझीही चौकशी करा आणि आपण हि ईडी ला सामोरे जा म्हणजे लोकांना कळेल आपणास लोकांना प्रमाणपत्र देता येईल की मला   ईडी ने सोडले  हे सर्व सोडून आपण आपले लक्ष विचलित करण्यासाठी आपण कसे स्वच्छ ठेवावे दाखवण्यासाठी दुसरीकडे बेछूट आरोप करीत आहे.

    ईडी मागे आपला हात आहे असे काही नाही मी एवढा मोठा माणूस नाही असे गिरीश म्हणाले ईडी माझे  ऐकत नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांचे मंत्रिपद काढण्यात आले त्यांनी भोसरी जमिनीत व्यवहार केला तो योग्य आहे की अयोग्य आहे हे ईडी ठरविणार आहे माझा काही संबंध येत नाही बी एच आर त्या मागे लागले म्हणून ईडी काढली असे काही नाही
    ईडी लागून 4 ते 5 वर्ष झाले तर बी एच आर ला आठ   महिने झाले आहे तुमचे प्रकरण चार पाच वर्षापूर्वी सुरू झाले   एवढे काय  झोटींग कमिशन नेमले गेले त्यावर चौकशी झाले हे सुद्धा ते विसरलेले दिसत आहे दुसरा विषय नव्हते तर काहीतरी कारण दाखवायचे आणि सांगायचे.

    मी तिकडे गेलो म्हणून इकडेईडी लागली आहे यात काही अर्थ नाही जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे द्या आपण जर निर्दोष असाल तर आम्ही डोक्यावर घेऊन जल्लोष स्वागत करू असे गिरीश महाजन म्हणाले कोणाला दोष देऊन उपयोग नाही खडसे साहेबांचा मतदार संघ कसा आहे याची कल्पना सर्वांना आहे आम्ही आमच्या मतदारसंघात 40 ते 50 हजार मतांनी निवडून यायचे त्यावेळेस खडसे साहेब की परिस्थिती काय होती की त्यांच्या मतदारसंघात 10 ते 12 हजार मतांनी जिंकायचे किंवा 7ते 7.5 हजार मतांनी जिंकायचे मी तर या वेळेस तीन चार महिने मतदार संघात आलोच नव्हतो पूर्ण राज्यभर फिरत होतो तरी 40 हजार मतांनी विजयी झालो खडसे साहेबांच्या घरातच सर्व पदे पदाधिकारी होते तरी काय झाले गेल्या वेळेस ते बाराशे मतांनी विजयी झाले होते असाही टोला त्यांनी लगावला.

    जर ते  मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत होते तर आपल्या मतदारसंघ पाठीशी आहे हे पाहिजे होतं कोठडीत 7 लोकांची ग्रामपंचायत मात्र तेथेही त्यांचे बहुमत नाही त्यांचा सरपंच सुद्धा नाही मुक्ताईनगरात काहीच राहिले नाही त्यांची मानसिकता मनस्थिती खराब झाली आहे त्यांच्या उपचार करावे लागतील मानपचार  तज्ज्ञाकडे दाखवावे लागेल की भविष्यात अजून तब्येत खराब होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल असाही टोला आमदार गिरीश महाजन यांनी या वेळी लगावला म्हणतात की 40 टक्के जिल्ह्यात विकास मी केला ठीक आहे आम्ही काही म्हणत नाही असे उत्तर देत महाजनांनी बोदवड मध्ये महिनाभर  पाणी मिळत आहे असा प्रश्न उपस्थित केला ते आमचे नेते होते मानसन्मान देत होते याचा अर्थ असा होतो होतो असे नाही की माझ्यामुळे हे सर्व आहे हा त्यांचा गैरसमज आहे.

    त्यांना इतका बी एच आर चा कळवळा येतो तर ज्या वेळेस त्यांचे व्यक्ती बँक बुडाली त्यावेळेस त्यांनी ठेवीदारांना म्हणाले होते की मला विचारून पैसे ठेवले होते का? असे ते म्हणाले होते मग बीएचआर व व्यह्याची (पूर्वी होते) बँक यात त्यावेळेस दुजाभाव का केला असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.