नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वर्षभरापासून नियमित पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराने महागाईमध्ये चांगलीच भर टाकली आहे. मध्यंतरी विविध राज्यांची सरकारं आणि केंद्र सरकारने टॅक्स कपात करून इंधनाचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तरीही बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळपास आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाच्या भावात चढ-उतार सुरू असल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र तेल कंपन्यांनी आजचे ३ मार्च रोजी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले असून आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
सध्या पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशातल्या चार महानगरांचा विचार करता दिल्लीतील पेट्रोलची किंमत 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपयांनी विकले जात आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 106.31 रुपये आहे आणि डिझेलची किंमत प्रति लिटर 94.27 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 106.03 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 92.76 रुपयांवर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 102.63 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 94.24 रुपये आहे. तथापि, देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये थोडीशी वाढ झाली आहे.