• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नातू रात्री गच्चीवर झोपला अन सकाळी परिवाराला बसला जबर धक्का

जळगावातील धक्कादायक घटना : गावासह परिवार झाले सुन्न

editor desk by editor desk
March 2, 2023
in क्राईम, जळगाव
0
नातू रात्री गच्चीवर झोपला अन सकाळी परिवाराला बसला जबर धक्का

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द या ठिकाणच्या एका तरुणाला एका चुकीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तरुणाचा घराच्या छतावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता हि घटना घडली आहे.

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी खुर्द येथील अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंकुशची आजी सकाळी त्याला उठवायला गेली असता हि घटना समोर आली आहे. गच्चीला कठडे नसल्याने झोपेच्या धुंदीत शौचालयाला जात असतांना अंकुश खाली पडला. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावातील अंकुश चौधरी हा आई, वडील, भाऊ यांच्यासोबत राहत होता. अंकुशचे वडील आजारी असतात. त्यामुळे अंकुश हाच शेतीचे सर्व कामे करत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शेतीची कामे आटोपून अंकुश हा घरी आला आणि जेवण करून घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी अंकुशची आजी त्याला सकाळी 6 वाजता उठवायला गेली असता हि धक्कादायक घटना उघडकीस आली. यावेळी अंकुश गच्चीच्या खाली रक्ताबंबाळ अवस्थेत आढळून आला. यावेळी नातवाचा मृतदेह पाहून आजीने आरडाओरड करत हंबरडा फोडला. ते ऐकून कुटुंबियांनीही गच्चीकडे धाव घेतली आणि अंकुशचा मृतदेह पाहून एकच आक्रोश केला.

या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंकुशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत अंकुशच्या माघारी आई सुनिता, भाऊ भावेश, वडील ज्ञानेश्वर विठ्ठल चौधरी, आजी गोपाबाई असा परिवार आहे. हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड या घटनेचा पुढील तपास करत आहेत. अकुशचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात गावात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

Previous Post

पुणे निकालानंतर चंद्रकांत पाटलांचा तो व्हिडीओ व्हायरल !

Next Post

जळगावातील ‘त्या’ अपघातातील दुसरा तरूण ठार !

Next Post
जळगावातील ‘त्या’ अपघातातील दुसरा तरूण ठार !

जळगावातील 'त्या' अपघातातील दुसरा तरूण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group