नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रियकरासोबतच्या नात्यात अडसर ठरत असलेल्या लहान बहिणीची मोठ्या बहिणीने हत्या केली. तिने प्रियकरासोबत मिळून लहान बहिणीची हत्या केली. दोघांनीही पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांपासून ते फार काळ लपून राहू शकलं नाही. पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली. हि घटना मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना साईखेडा येथील आहे. साईखेडा पोलिसांना हॉस्पिटलमधून सूचना मिळाली की, एका तरूणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. पोलीस लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तरूणीला तिची बहीण आणि आई हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. कुटुंबियांनी सांगितलं की, तरूणी बाथरूममध्ये पडून मरण पावली. पण घटना संशयास्पद होती. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू केली.
चौकशी दरम्यान पोलिसांना मृत तरूणीच्या मोठ्या बहिणीवर संशय आला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. पण तिने हत्या केल्याचं नाकारलं. पण जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिने सगळं सत्य सांगितलं. तिने पोलिसांना सांगितलं की, तिची मैत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये राहणाऱ्या राहुल सिंहसोबत झाली होती. हळूहळू दोघे प्रेमात पडले.
तिने पोलिसांना सांगितलं की, ती राहुल सिंहसोबत लग्न करणार होती. पण लहान बहीण शिखाला हे मान्य नव्हतं. अनेकदा समजावून सांगितलं तर ती ऐकत नव्हती. पोलिसांनी सांगितलं की, मोठी बहीण खूशबूच्या अनेक गोष्टी होत्या ज्यामुळे ती शिखाला कंटाळली होती. दोघींमध्ये सतत वाद होत होते. शिखाला मारण्यासाठी खूशबूने प्रियकराला सोबत घेतलं. ती त्याला म्हणाली की, जर माझ्यासोबत लग्न करायचं आहे तर त्याला शिखाची हत्या करावी लागेल.
राहुलने खुशबूचा हा प्रस्ताव स्वीकारला आणि अमेठीहून नरसिंहपूरच्या साईखेडा इथे आला. 22 फेब्रुवारीला तो साईखेडा इथे आला तेव्हा खुशबूने आईला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवलं. त्यानंतर तिने राहुलला घरी बोलवलं आणि शिखाची हत्या केली. दोघांनी आधी शिखाच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला आणि चाकूने तिच्यावर अनेक वार केले. त्यानंतर शिखा बाथरूममध्ये पडल्याची कहाणी रचली.