Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमपीडीए कायद्याखाली समीर काकर स्थानबद्ध !
    क्राईम

    एमपीडीए कायद्याखाली समीर काकर स्थानबद्ध !

    editor deskBy editor deskMarch 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील समीर हनीफ काकर या तरुणास एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले आहे. समीर काकर याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न या कलमाखाली एक, गंभीर दुखापत करणे या कलमाखाली एक, गर्दीसह दुखापत या कलमाखाली एक, सरकारी नोकरावर हल्ला या कलमाखाली एक आणि घरफोडीचे पाच असे एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत.

    जळगाव शहर, रामानंद नगर आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन अशा तिन पोलिस स्टेशनला मिळून त्याच्याविरुद्ध एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. जयपाल हिरे व पो.नि. शंकर शेळके यांच्यासह सहायक फौजदार युनुस शेख, हे.कॉ. सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, इश्वर पाटील, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. नितीन पाटील, सचिन पाटील, इमरान सैय्यद, इमरान बेग आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील समीर काकर याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.