Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » समाजसेविकेची जळगावात फसवणूक : गुन्हा दाखल !
    क्राईम

    समाजसेविकेची जळगावात फसवणूक : गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskMarch 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका महिला समाजसेविकाची केंद्र सरकारच्या तीस टक्के अनुदान योजनेतून गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक झाल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून किरण मुरलीधर फेगडे आणि रोहन महेंद्र फेगडे (दोघे रा. मस्कावद ता. रावेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

    मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गोलाणी मार्केटच्या दुस-या मजल्यावर राहणा-या समाजसेविकेने याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला धाव घेत आपली हकीकत मांडली. या घटनेतील दोघांनी समाजसेविकेकडून ३ गरीब विद्यार्थ्यांच्या नावे लॅपटॉपच्या ७० टक्के रक्कम ९५ हजार रुपये घेतल्याचे म्हटले आहे. अद्याप लॅपटॉप मिळाले नाही अथवा दोघांनी पुर्ण रक्कम देखील समाजसेविकेला परत केली नाही. तगादा लावल्यानंतर केवळ दहा हजार रुपये समाजसेविकेला परत मिळाले. उर्वरीत ८५ हजार रुपये परत मिळण्यासाठी समाजसेविकेने दोघांकडे तगादा लावून देखील मिळाले नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार संजय बडगुजर करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.