Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » घरात कुणालाही न सांगता पडला बाहेर अन जळगावात घडली अशी घटना
    क्राईम

    घरात कुणालाही न सांगता पडला बाहेर अन जळगावात घडली अशी घटना

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 28, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहरातील हरिविठ्ठल नगरातील हरीविठ्ठल नगरातील १६ वर्षीय मुलाचा जळगाव ते शिरसोली रेल्वेलाईन दरम्यान धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. रोहित लक्ष्मण मोरे (वय-१६) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेली माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरातील तडवी गल्लीत आई किरणबाई व वडील लक्ष्मण मोरे यांच्यासोबत रोहित मोरे हा आपल्या परिवारासह रहायला होता. रामानंद नगरातील बहिणाबाई चौधरी माध्यमिक विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता रोहित हा घरात कुणाला काहीही न सांगता घराबाहेर पडला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रेल्वेलाईन दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४१५/१६ ए जवळ धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे त्याची ओळख पटली. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. एकुलता एक मुलगा गेल्याने आई व वडीलांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विकास महाजन करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.