Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री यांच्या हस्ते 20 महिलांना धनादेशाचे वाटप !
    जळगाव

    पालकमंत्री यांच्या हस्ते 20 महिलांना धनादेशाचे वाटप !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 1, 2021Updated:October 1, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव तालुक्यातील 20 महिलांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत प्रत्येकी 20 हजार याप्रमाणे 4 लाख  रुपयांच्या मदतीचे धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित  कार्यक्रमात वाटप करण्यात आले.

    राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानुसार आज  तालुक्यातील 20 महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या अर्थसहाय्यतून मुलांच्या शैक्षणिक व आवश्यक बाबींवर खर्च करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी उपस्थित महिलांना केले.

    असे आहेत पात्र लाभार्थी

    दापोरा येथील श्रीमती जया ठाकरे ,अनुसया तांदळे देवकाबाई पाटील, भागवत सोनवणे , सुमनबाई तांदळे जळके येथील श्रीमती सीमा जाधव , शिरसोली येथील श्रीमती वंदनाबाई भोई , कानळदा येथील श्री विष्णू बाविस्कर,  श्रीमती सिंधू नन्नवरे, उषाबाई सपकाळे,  इंद्रायणी सोनवणे,  नलिनी गायकवाड,  नशिराबाद येथील श्रीमती अख्तरजहाँ मन्यार, धानवड येथील श्रीमती पिंकीबाई राठोड, फुपनी येथील श्रीमती कमलाबाई सैंदाणे , विदगाव येथील आशाबाई कोळी,  तरसोद येथील सुनंदाबाई थोरात,  धामणगाव येथील अन्नपूर्णा बाविस्कर,  सुलभा सपकाळे, यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

    याप्रसंगी जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, महानगर प्रमुख  शरद तायडे, युवासेनेचे शिवराज पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी) , फुपनी मा. सरपंच डॉ.कमलाकर पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे जळगाव ग्रामीणचे तालुका अध्यक्ष रमेशआप्पा पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, गजानन मालपुरे, पंकज पाटील, प्रविण पाटील, उमाजी पानगळे  व सचिन चौधरी,तहसीलचे अव्वल कारकून अर्चना पवार, ज्योती चौधरी यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

    तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रास्ताविकात या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेशअप्पा पाटील यांनी केले तर आभार अव्वल कारकून के आर तडवी यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.