नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संघर्षावरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडली. या सत्तासंघर्षावरील सुनावणी याचं आठवड्यात संपणार असल्याची माहिती घटनापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी संवाल साधला.
राहुल शेवाळे म्हणाले की, निवडणूक आयोगाने जो शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे. त्यानुसार आता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते शिंदे आहेत. राज्यसभेचे गटनेते आता संजय राऊत आहे. मात्र यापुढे संसदेचा गटनेता ठरविण्याचा अधिकार आता शिंदे यांनाच आहे. त्यानुसार संसदीय कार्यमत्र्यांना संसदेचा गटनेता म्हणून गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्याचं पत्र दिल्याची माहिती शेवाळे यांनी दिली.
राज्यसभेत तुमचे तीन खासदार आहेत. त्यात संजय राऊत यांचाही समावेश आहे. त्यांनाही शिवसेनेचा व्हिप मान्य करणे अनिवार्य असल्याचं शेवाळे यांनी नमूद केलं. मात्र आता लगेच संसदेच्या अधिवेशनात व्हिप देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र गटनेतेपदावरून संजय राऊत यांना हटविण्याची प्रक्रिया शिवसेनेकडून सुरू करण्यात आली हे त्यांनी स्पष्ट केलं. राज्यपालांनी जो फ्लोअर टेस्टचा निर्णय़ घेतला, त्याबाबत सर्वोच्च न्यायालायाची वेगळी भूमिका होती. परंतु विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे होते. नेता म्हणूनच त्यांनी राज्यपालांना पत्र दिलं होतं. विधीमंडळ नेता म्हणूनच आमदारांनी शिंदेंवर दबाव आणला होता. म्हणून गटनेता त्यांनी राज्यपालांना पत्र पाठवल्याचं शेवाळे यांनी स्पष्ट केलं.