जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील नदी पात्राच्या किनाऱ्यावरून वाळू चोरीची माहिती मिळाल्याने तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाळू चोरी करण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या तूरखेडा गावाकडे जाणाऱ्या कच्यारोडवर एका स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व ट्रोलीमध्ये संशयित आरोपींनी १ ब्रास वाळूची अवैध वाहतूक करताना आढळून आल्याने पोलिसांनी दि २७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर ३ लाख रुपये किमतीचे व ३ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा माल ताब्यात घेतला असून या प्रकरणी संशयित आरोपी किरण साळुके(वय २३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.कोळी हे करीत आहेत.